जारकरवाडीतील तरुणाची MPSC मध्ये गरुड झेप !!

जारकरवाडीतील तरुणाची MPSC मध्ये गरुड झेप !!


 


देशातील लहाण मोठ्या गावातून मोठी स्वप्न उराशी बाळगणारे बरेच जण आसतात. परंतु यश प्रत्येकालाच मिळेल असे नाही. त्यासाठी स्वप्न मोठी असून चालत नाहीत तर अंगी जीद्द आणि चिकाटी देखील असावी लागते. अश्याच जारकरवाडी गावातील निलेश मारुती काकडे या तरुणाने जीद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर यशाला गवसणी घालत महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC परिक्षेत 'सहायक आयुक्त विक्रीकर' पदी (Assistant. Commissioner of State Tax-A)निवड झाली आहे.


 अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घरी कसल्याही प्रकारची आत्याधूनीक सेवा सुविधा ऊपलब्ध नसताना देखील त्याने हे यश खेचून आणले आहे. निलेश खरोखरच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. आज खरंच असंख्य होतकरू विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान ठरलेल्या निलेशला हे धेय्य साध्य करण्यासाठी अखंड काबाड कष्ट करावे लागले आहेत. त्याचे वडील मारुती काकडे यांनी छोटेसे हॉटेल चालवत घरची जबाबदारी निलेशच्या शिक्षणाचा खर्च भागवला. निलेशने देखील आपल्या वडीलांचे कष्ट वाया जाऊ नं देता अपार मेहनत करुन ही परिक्षा पास होऊन गावचे व तालुक्याचे नाव रोशन केले आहे. त्यामुळे जारकरवाडी गावातील सरपंच अॅड. रूपालीताई भोजने यांनी "तुझ्या या अलौकिक यशाचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो आहे" अश्या शब्दांत निलेशचे अभिनंदन केले आहे. तसेच सर्व गावाच्या वतीने निलेशवर शुभेच्छांचा वर्ष होत आहे. त्यामुळे निलेशच्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा....!!!!