पनवेल: कोव्हिड-१९ महामारी मध्ये शासनाने लोकडाउन जाहिर केले याच काळात MSEB ने लॉकडाउन च्या काळात बिलाची रीडिंग न घेता सरसकट तीन महिण्यांचे बिल पाठवल्यामुळे अचानक अधिक बिल आल्याने कामोठ्यातील नागरिक हैरान झाले होते. व ते न भरल्यास वीज खंडित होण्याची भीति निर्माण झाली आहे, त्या संदर्भात आज भारतीय जनता पार्टी कामोठे च्या प्रतिनिधि मंडळाने पनवेल चे आमदार प्रशांतदादा ठाकुर यांच्या मार्गदर्शनाने कामोठे मंडळ अध्यक्ष मा. श्री रविंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सहायक विद्युत अभियंता श्री सूर्यताळ साहेब यांची भेट घेतली व ह्या कोरोना संकटकाळात अतिरिक्त विद्युत भार, वाढीव बिल, घर बंद असुन आलेले बिल, व इतर तांत्रिक विषयांवर चर्चा केली, भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष श्री हर्षवर्धन पाटील यांनी पुढाकार घेऊन नागरिकांच्या समस्यांचे पत्र व लेखी निवेदन हे अधिका-यांच्या लक्षात आणुन दिले. प्रतिनिधि मंडळातील नगरसेवक विजय चिपलेकर, विकास घरत,युवानेते हैप्पी सिंग व भाजपा कामोठे मंडळ महामंत्री सुशीलकुमार शर्मा यांनी सदर समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढुन नागरिकांना दिलासा द्यावा ही विनंती केली आहे. त्यावर सात दिवसाच्या आत वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करून उपाययोजना करू व ज्या तक्रदारांचे पत्र प्राप्त झालेले आहेत पडताळणी होई पर्यंत त्यांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही असे आश्वासन सहायक विद्युत अभियंता सूर्यताळ यांनी दिले अशी माहिती सुशीलकुमार शर्मा यांनी दिली आहे
MSEB ला कामोठेमधील भाजपा कार्यकर्त्यांचा दणका