पांडवकडा धबधबा येथे विनाकारण फिरणाऱ्यांवर खारघर पोलिसांची कडक कारवाई

पांडवकडा धबधबा येथे विनाकारण फिरणाऱ्यांवर खारघर पोलिसांची कडक कारवाई


 


खारघर: लॉकडाऊनचे उल्लंघन करणारे तसेच पांडवकडा, फणसवाडी, ड्रायव्हींग रेंज या प्रतिबंधित क्षेत्रात जाणाऱ्या लोकांविरुद्ध खारघर पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून विनाकारण फिरणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


करोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये याकरता लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी खारघर पोलिसांनी विनाकारण फिरणारे, मॉर्निंग वॉकला जाणारे, मास्क न वापरणारे, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणारे यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली असून एकूण अत्तापर्यंत ५९ लोकांवर भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ अन्वये ३४ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच पाच वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.


पांडवकडा, फणसवाडी ड्रायव्हींग रेंज या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे एकूण तेवीस लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मोटार वाहन अधिनियमान्वये १३० गुन्हे दाखल करण्यात आले आहे


तरी सर्व नागरिकांनी लॉक डाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे व पांडवकडा या प्रतिबंधक क्षेत्रात प्रवेश करु नये असे आवाहान खारघर पोलिसांमार्फत करण्यात येत आहे.