खारघर तळोजा कार्यकारिणी अध्यक्ष विनोद घरत यांचा शरद पवारांच्या निवासस्थानी निषेध म्हणून २० हजार पत्रे पाठवण्याचा मानस 


 


 


खारघर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या ‘काही लोकांना वाटते की राम मंदिर बांधल्याने कोरोना जाईल’ या नकारात्मक वक्तव्याने समस्त नागरिकांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांना ‘प्रभू श्री रामचंद्रांच्या’ नावाची आठवण करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी ने राज्यभरातून याचा निषेध म्हणून “जय श्री राम” लिहिलेली १० लाख पत्र त्यांच्या निवास स्थानी पाठवण्याचे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर यावेळी उत्तर रायगड जिल्ह्यातून २० हजार पेक्षा अधिक पत्रे पाठवण्याचा निर्धार युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. म्हणून आज भारतीय जनता पार्टी खारघर व तळोजा युवा मंडळाचे अध्यक्ष विनोद घरत सरचिटणीस अमर रमेश उपाध्याय. उपाध्यक्ष शुभ पाटील व अक्षय पाटील. सचिव फुलाजी ठाकूर. खजिनदार प्रमोद पाटील. सदस्य सुशांत पाटोळे. सदस्य सुजित पांडे. सदस्य राजू अचलकर. तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य खारघर येथील पोस्ट ऑफिसला जय श्रीराम नावं असलेले पोस्टकार्ड पोस्ट करण्याकरिता जमले होते.