भाजपाच्या खारघर तळोजा विभागाच्या युवा मोर्चा अध्यक्षपदी विनोद घरत यांची तर सचिवपदी फुलाजी ठाकूर यांची निवड


 


खारघर: भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पक्षाची खारघर आणि तळोजा येथील कार्यकारिणी सभासदांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी विनोद कृष्ण घरत यांची निवड करण्यात आलेली आहे. तर सचिव पदासाठी फुलाजी शंकर ठाकूर यांची निवड झालेली आहे. तसेच उपाध्यक्षपदी शुभ सोमनाथ पाटील व अक्षय श्यामराम पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे. सरचिटणीस पदी अमर रमेश उपाध्याय यांची निवड झालेली आहे. व सचिव पदासाठी फुलाजी शंकर ठाकूर आणि पप्पू नवनाथ खामकर व कोषाध्यक्ष पदी प्रमोद जनार्दन पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच या कार्यकारिणीच्या सदस्य पदी प्रदीप कचेर पाटील, कमलकांत विद्याधर लंका, सचिन बाबूराव फडके, मनिष गौतम जैन, सिध्देश संतोष सावंत, सुशांत मनोहर पाटोळे, राजू नारायण आचलकर आणि सुजीत संजय पांडे यांची निवड करण्यात आलेली आहे. 


भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणींची निवड पार पाडण्यात आलेली आहे.